बिग ब्रेकिंग! फळबाग लागवडीसाठी तब्बल 104 कोटींचे अनुदान मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. विविध राज्यांनी शेतकऱ्यांना (Agriculture) विशिष्ट बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले आर्थिक (Financial) उत्पन्न मिळावे यासाठी फळबाग पिकांच्या लागवडीसाठी विविध योजना (Yojana) राबविण्यात येत आहेत. राज्यात लाखाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यापैकीच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना’ होय.
वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विजेचा शॉक; ‘या’ शेतकऱ्यांची धडाधड वीज कापण्याचे निर्देश
2022-23 मध्ये योजना राबविण्यास मंजुरी
कोरोनाच्या काळात भाऊसाहेब फुंडकर फळबाग ही योजना (Yojana) राबवली गेली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये. ही योजना बंद पडली की काय? असा संभ्रम निर्माण झाला होता. त्याचबरोबर 2022- 23 मध्ये देखील ही योजना जाईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे. बरेच शेतकरी (Department of Agriculture) या योजनेसाठी पात्र होण्याची अपेक्षा होती. आता त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणारं आहे.
पीएम किसानचा 12वा हप्ता अडकलाय? आता 13वा हप्ता अडकण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…
कधीपर्यंत करू शकता अर्ज?
राज्य सरकारच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरता 104 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान (Subsidy) मंजूरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग होण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. शेतकरी ‘महाडीबीटी’ प्रणालीवर अर्ज करू शकणार आहेत.
104 कोटींचा निधी मंजूर
4 ऑक्टोबर 2022 रोजी या योजनेला राबवण्यासाठी एक शासन निर्णय घेऊन 2022-23 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 104 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?
शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू इत्यादी फळझाडांसाठी या योजनेंतर्गत लागवडीसाठी लाभ मिळेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाच्या दराने घेतली मोठी झेप, जाणून घ्या किती मिळतोय दर?
- नादचखुळा! शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, खात्यात येणार तब्बल 5 लाख
Web Title: Big Breaking! As many as 104 crores grant sanctioned for orchard cultivation; Apply by date