दिनंदीन बातम्या

Agricultural festival| परळी वैद्यनाथला मिळाला कृषी महोत्सवाचा सोहळा

Agricultural festival| बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे बुधवार, 21 ऑगस्ट पासून पाच दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव रंगतदारपणे सुरू झाला. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान (great honor) योजनेचा चौथा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे. तसेच सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे.

शेतकरी आणि कृषी यांचे सांगते

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने या महोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. भव्य वॉटरप्रूफ सभामंडप, चर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंग, भोजन आदी चोख व्यवस्था (Good arrangement) करण्यात आली आहे.

या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आदी मान्यवर उपस्थित राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे.

वाचा: Aloe plantation| सातारा जिल्ह्यातील तरुण शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी कोरफड लागवडीतून मिळवली कोट्यवधीची उलाढाल

शेतकऱ्यांसाठी एकमेव सोला

या पाच दिवसीय कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चा सत्रे, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांची दालने, भाजीपाला महोत्सव, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्री, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात (at the festival) शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत.

परळी वैद्यनाथ सज्ज

या कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे. बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी – कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह (excitement)पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button