बाजार भाव

Onion Rates | सरकारचा धक्कादायक निर्णय; कांद्याचा दर 25 रुपयांवर येणार, जाणून घ्या काय ?

Onion Rates | Govt's Shocking Decision; The price of onion will come to 25 rupees, do you know?

Onion Rates | देशभरात कांद्याच्या दरात वाढ होत असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर 29 ऑक्टोबरपासून 800 डॉलर प्रति टन निर्यातशुल्क लागू केले जाणार आहे. हे (Onion Rates) निर्यातशुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

या निर्णयामुळे कांद्याची निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांदा उपलब्ध होईल आणि त्याचे दर कमी होतील.

केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी आणखी काही उपाययोजना केल्या आहेत. त्यात 2 लाख टन राखीव कांदा खरेदी आणि मोबाईल व्हॅनमधून 25 रुपये किलो दराने कांद्याची विक्री यांचा समावेश आहे.

12th Fail Movie Review | 12 वी फेल चित्रपटाची प्रेरणादायी कथा ; जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट …

कांद्याचा दर सरासरी प्रति किलो 75 रुपये

आज (28 ऑक्टोबर) दिल्लीत कांद्याचा दर सरासरी प्रति किलो 75 रुपये आहे. घाऊक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी होत असल्यानं दरात वाढ झाली आहे.

रब्बी हंगामातून कांद्याचे कमी उत्पादन

एकीकडे रब्बी हंगामातून कांद्याचे कमी उत्पादन झाले. तर दुसरीकडं खरीप हंगामातील कांद्याची आवक होण्यास उशीर असल्यानं येत्या काही दिवसात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत.

हेही वाचा :

Web Title : Onion Rates | Govt’s Shocking Decision; The price of onion will come to 25 rupees, do you know?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button