FRP | राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्यात येतो. म्हणूनच राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी (Agriculture) निर्णय घेऊन आर्थिक (Financial) दिलासा ज्याचा प्रयत्न करत असत. आता ऊस उत्पादकांना (Sugarcane FRP) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) एकरकमी एफआरपी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग राज्य शासनाने काय निर्णय घेतला आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.
वाचा: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना बसणार मोठा झटका! होणारं ‘हे’ मोठे बदल
राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली. त्याचवेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी एफआरपी (Agri News) देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Type of Agriculture) एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, “शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला कसं सुखी करता येईल यासाठी त्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ.”
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: