ऊसतोड कामगारांच्या कुटुंब व मुलांसाठी सरकार करणार खर्च! कारखानेही देणार प्रती टन एक रुपया…
मुंबई : ऊसतोड कामगार हा साखर कारखाना उद्योगातील महत्त्वाचा घटक आहे. या कामगारांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश देत सरकारने (Goverment) ‘ऊसतोड कामगार कल्याण निधी’ उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व सहकारी व खासगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रती टन दहा रुपये प्रमाणे निधी (Fund) गोळा केला जाणार आहे.
वाचा –
असा जमा केला जाणार निधी
‘ऊसतोड कामगार निधी’ साठी गोळा केली जाणारी ही रक्कम सहकार विभाग व राज्य साखर आयुक्त यांच्याकडून तपशीलवार पडताळणी करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा निधी दोन टप्प्यात संकलित केला जाणार आहे. राज्यातील गाळप होणाऱ्या ऊसाच्या प्रमाणात जेवढी रक्कम जमा होईल तितकीच रक्कम निधी म्हणून शासन ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास’ उपलब्ध करून देणार आहे.
वाचा –
कुटुंब व मुलांच्या उन्नतीसाठी केला जाणार खर्च
सरकारने ऊसतोड कामगारांच्या विकासासाठी हे पाऊल उचलले असून ‘ऊसतोड कामगार कल्याण निधी’ अंतर्गत संकलित होणारा निधी ऊसतोड कामगार, त्यांचे कुटूंबीय व त्यांच्या मुलांच्या उन्नती आणि शिक्षणासाठी (Education) खर्च केला जाईल.
शेतकऱ्यांना याचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही
निधीसाठी करखान्यांकडून गोळा करण्यात येणारी ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एफआरपी’ तून न घेता ती कारखान्याने त्यांच्याच ताळेबंदातून जमा करायची आहे असे शासन आदेशात सांगितले गेले आहे. यामुळे या निधीसाठी शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.
हे ही वाचा –