कृषी बातम्या

‘स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?

Government to take important decision regarding 'ownership scheme'! Read How will you benefit from this scheme?

बहुतांशी खेड्यापाड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीची नोंद (Land registration) नाही,किंवा मालकी हक्क (Ownership) सांगण्यासाठी कोणतेही कागदपत्र (Documents) नाहीत, स्वामित्व योजनेअंतर्गत (Under the ownership scheme) ग्रामीण भागातील निवासी जमिनीची मालकी निश्चित करणे व त्याची नोंदी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. याचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांना आपला मालकी हक्क मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

ड्रोनच्या सहाय्याने (drones) जमिनीची मोजणी केली जाणार आहे यासाठी गूगल मॅपिंग (Google Mapping) तंत्राचा उपयोग देखील होणार आहे. याचा उपयोग ग्रामीण भागातील निवासी मालमत्तेची नोंद झाल्यावर, त्यांच्याकडून करवसुली (Tax collection) केली जाईल, या कर वसुलीच्या माध्यमातून ग्रामीण विकास करण्याचे सरकार योजत आहे. मालकी हक्क योजनेमुळे ग्रामीण समाजातील सर्व कामे ऑनलाईन केली जातील. ऑनलाईन असल्याने लोकांना त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती ऑनलाईन (Online) पाहता येईल.

स्वामित्व योजनेद्वारे मालमत्तेची मालकी हक्क ठरवणे हा आहे, यामुळे कोणत्याही मालमत्तेवर वाद (Dispute over property) असल्यास, लवकरच त्याचे निराकरण करणे शक्य होईल, कारण मालकी हक्कासंदर्भात सर्व माहिती ऑनलाइन असल्याकारणाने, वाद मिटविणे शक्य होईल.

या योजनेअंतर्गत,सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे, प्रॉपर्टी कार्डसाठी (For property cards) अर्ज करावा लागणार नाही, सर्वेचे संपूर्ण काम झाल्यानंतर सरकारच लोकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देईल. गावाचे सर्वेक्षण (Survey) झाल्यानंतर त्यासंबंधी संपूर्ण माहिती डेटा पंचायती राज मंत्रालयाच्या (Data of the Ministry of Panchayati Raj) ई-ग्राम स्वराज पोर्टलवर (On e-Gram Swaraj Portal) अपलोड केला जाईल.

हे ही वाचा :

1. गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…

2. राज्यभरात राबवणार कृषी संजीवनी योजना; शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करणार – कृषी मंत्री दादाजी भुसे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button