ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पूरग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय; राज्यसरकारमुळे “शेतकरी” लाभ घेण्यापासून वंचित..

शेतातील पिकांचे (Farm crops) अतोनात नुकसान झालेले आपण पाहिले आहे. यासाठी शेतकऱ्यांना (farmers) सरसकट मदतीची मागणी शासनाकडे केली होती पण नवीन नियम, अटी घालून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम राज्य सरकार (State Government) करत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याऐवजी त्यातून पळवाट शोधत कमीतकमी शेतकऱ्यांना (farmers) कसा लाभ देता येईल व जास्तीतजास्त शेतकरी (Farmers) शासनाच्या लाभापासून कसे वंचित ठेवता येतील याचे पूर्ण नियोजन राज्य शासनाकडून करण्यात आले असल्याचे शासन आदेशावरून स्पष्ट होत आहे.

वाचा –

शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय –

बाळापूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पातुर, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात नदीकाठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा शासन आदेश (Rule order) निघाल्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळापूर तालुक्यातील हातरुण, अंदुरा भाग एक, भाग दोन, सोनाळा, कारंजा रमजानपूर, हाता, बोरगाव वैराळेसह तालुक्यातील अनेक गावातील शेकडो शेतकऱ्यांना या आदेशामुळे नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

वाचा

शासन निर्णय –

ज्या शेतकऱ्यांच्या (farmers) नावाने दोन हेक्टर पेक्षा एक गुंठा ही जास्त शेती (Agriculture) असेल त्या शेतकऱ्यांना शेती अर्धा एक्कर जरी खरडून गेली असेल तरी त्यांचे नाव दोन हेक्टर शेती असल्यामुळे शासनाच्या नियमात बसणार नाही. त्यामुळे नुकसानभरपाईच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात यावे अशा आशयाचे पत्र बाळापूरचे तहसीलदार डी. एल. मुकुंदे यांनी बाळापूर तालुक्यातील प्रत्येक तलाठ्यांना दिले आहे.

त्यामुळे शासनाने (government) आता पुरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आणखी संकटात टाकल्या सारखे दिसत आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button