ताज्या बातम्या

महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर ‘ हे ‘ ठरले यंदाचे मानकरी

Government of Maharashtra announces Vasantrao Naik Shetinishtha Puraskar

सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना 2019 चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी घोषणा केली.
मागील दहा वर्षापासून अण्णासाहेब अर्जुन राव जगताप हे प्रयोगशील शेतकरी आहेत तसेच सेंद्रिय पद्धतीने ते शेती करतात त्यामुळे यंदा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कृषी, कृषी संलग्न क्षेत्र आणि फलोत्पादन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 31 मार्च रोजी जाहीर करण्यात आला.

या पुरस्काराचे मानकरी माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप प्रदान करण्यात आला.

अण्णासाहेब हे सेंद्रिय शेतीचा मागील १० वर्षांपासून प्रसार आणि प्रचार करत आहेत. त्यांचे यु ट्यूब वर ‘दिशा सेंद्रिय शेती’ असे चॅनलसुद्धा आहे. यावरून ते सेंदीय शेतीच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवतात. या पुरस्कारामुळे अण्णासाहेब जगताप यांचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

पुरस्कार घेतेवेळी अण्णासाहेब जगताप शेती विषयक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग कसे केले हे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

सेंद्रिय भाज्यांचा माणसांच्या शरीरावर व जमिनीवर सकारात्मक कसा परिणाम होतो हे त्यांनी सांगितले आहे . सेंद्रिय शेतीमुळे पौष्टिकता वाढते. सुरुवातीला सेंद्रिय शेती करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, न डगमगता ते प्रयोगांवर ठाम राहिले. त्यांच्याकडे भाज्या, गाजर, धान्य यांची विविध प्रकारची गावरान ६० बियाणे आहेत. हा व्यवसाय नाही मात्र सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा हाच त्यांचा उद्धेश आहे.

कोणत्याही कामांमध्ये अडथळे येत असतात. कष्टाला कर्तृत्वाची साथ असल्यास यशाचा मार्ग अधिक सुखकर होतो अण्णासाहेब जगताप यांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button