ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Varkari Bima Yojana | बिग ब्रेकींग! पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण; तब्बल 5 लाखांपर्यंत मिळणार लाभ, मुख्यमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय

Varkari Bima Yojana| पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण (Health Insurance) असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

काय आहे योजना?

पंढरपूरच्या आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना वारीच्या 30 दिवसांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी (Varkari Bima Yojana)विमाछत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे.

कसे मिळणार विमा संरक्षण?

वारीदरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रहअनुदान देण्यात येणार आहे. या दुर्घटनेत कायमचे अपंगत्व, विकलांगता आल्यास 1 लाख रुपये, तर अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तर आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

का घेतला निर्णय?

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात #वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Big Breaking! Insurance coverage for workers in Pandharpur’s Ashadhi Wari will get benefits of up to 5 lakhs by the government, the bold decision of the Chief Minister

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button