ताज्या बातम्या

Government Decision | नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे साखर कारखानदारांची चिंता वाढली! पहा सविस्तर…

Government Decision | The recent decision has increased the concern of sugar millers! See details...

Government Decision | खुल्या बाजारात साखरेच्या दरात घसरण होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSCB) २ मार्चपासून साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांची घट करण्याचा निर्णय घेतला आहे. (Government Decision) या निर्णयामुळे साखर कारखानदारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नवीन मूल्यांकनाचा परिणाम:

या निर्णयानुसार, साखरेचे मूल्यांकन आता ३३०० रुपये प्रति क्विंटल असेल. याचा थेट परिणाम म्हणून कारखान्यांना प्रति क्विंटल २९७० रुपये इतकीच उचल मिळणार आहे.

साखर उद्योगाची अस्वस्थता:

साखर कारखानदारांच्या मते, हा निर्णय त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. साखर कारखान्यांचे व्यवस्थापन खर्च वाढले आहेत, त्याचबरोबर केंद्र सरकार अद्याप साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास तयार नाही. यावरुन साखर कारखानदारी चालवणे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे.

वाचा | Incentive Grant | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

हंगामाच्या अंतिम टप्प्यात निर्णयाची शंकास्पद वेळ:

या निर्णयाची वेळही साखर कारखानदारांना खटकत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात असा निर्णय घेतल्याने शेवटच्या टप्प्यातील ऊस उत्पादकांच्या बिले विलंबाने मिळण्याची शंका आहे. यामुळे ऊस उत्पादकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.

MSCB चा मागील निर्णय:

२०२० पर्यंत MSCB दर तीन महिन्यांनी साखरेच्या दराचा आढावा घेऊन मूल्यांकन ठरवत होती. मात्र, २०२० मध्ये केवळ किमान विक्री मूल्य लक्षात घेऊन साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये केले होते. त्यानंतर साखरेच्या दरात चढ-उतार होत राहिली, परंतु बँकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता.

अलीकडे काही कारखानदारांनी मूल्यांकन वाढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार, २०२४ च्या सुरुवातीला MSCB ने साखरेच्या मूल्यांकनात वाढ केली होती. मात्र, आता केवळ दोन महिन्यांतच मूल्यांकन पुन्हा कमी केल्यामुळे साखर उद्योगात संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title | Government Decision | The recent decision has increased the concern of sugar millers! See details…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button