महाराष्ट्रातील तमाम शेतकरी (Farmers) बांधवांसाठी सुखत वार्ता म्हणजे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवण्यात येणार आहे. याबाबतीत काल मंत्रिमंडळामध्ये (In the cabinet) हा निर्णय मंजूर करण्यात आला. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी तीन लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज (Interest free loan) मिळावे याकरता बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात (In the budget) केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी (Implementation) करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
हेही वाचा : विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल …
शासनाच्या (Of government) या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख शेतकरी याचा फायदा होणार आहे. यंदा सरकारने 60 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यामुळे नियमित कर्जफेड (Regular loan repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.
कृषि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती (Economic situation) सुधारण्यास मदत होईल.
हेही वाचा : किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!
या योजनेमुळे शेतकरी तसेच बॅंकांची (Of banks) परिस्थिती सुधारण्याची देखील आशा आहे,खरीप हंगामामध्ये घेतलेल्या निर्णयाचा निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
1)SBI बँकेतमध्ये खाते असलेल्यांनी, ‘हे’ काम करा अन्यथा सबसिडी विसरा!
2)जनावरांमध्ये आढळणारा,’लाळ्या खुरकुताचा रोगाचा’ प्रभाव झाला आहे हे कसे ओळखाल?