योजना

Government Decision | शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय! थेट मिळणार आर्थिक लाभ, जाणून त्वरित घ्या लाभ

Government Decision | आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय (Government Decision) घेण्यात आले. यात मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी या वर्षीही मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार यांसाठीही अनेक योजना आणि उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय:

  • मुंबईकरांना दिलासा: या वर्षीही मालमत्ता करात वाढ नाही.
  • रोजगार निर्मिती: राज्यात “नमो महारोजगार मेळावे” आयोजित करून 2 लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण केले जातील.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी: मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षांवरील नागरिकांना लाभ देण्यात येतील.
  • शहरी विकास: राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाभियान राबवून पायाभूत सुविधा बळकट केल्या जातील.
  • शेतकऱ्यांसाठी: उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येईल.
  • मध उद्योगाला चालना: मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवून मध उद्योगाला बळकट केले जाईल.
  • पर्यटन विकास: जुन्नर तालुक्यात बिबट सफारी राबवून पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल.
  • बंजारा, लमाण समाजाचा विकास: बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करून मूलभूत सुविधा पुरवल्या जातील.

वाचा | Suryoday Yojana | काय सांगता? दर महिन्याला 300 युनिट वीज मिळणार मोफत; शेतकऱ्यांनो लगेच जाणून घ्या सरकारची ही भन्नाट योजना…

  • शिर्डी विमानतळाचा विस्तार: शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार करून नवीन इमारत उभारण्यात येईल.
  • धारावी पुनर्वसन: धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्यात येईल.
  • सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना: सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते दिले जातील.
  • सिंचन प्रकल्प: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
  • कृषी विद्यापीठ: कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष असेल.
  • सार्वजनिक बांधकाम: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय उभारण्यात येईल.
  • गोसेवा आयोग: गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद स्थापन करण्यात येईल.

याशिवाय बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील नागरिकांना निश्चितच लाभ होईल.

Web Title | Government Decision | Shinde government’s bold decision for farmers! Direct financial benefits, know and take benefits immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button