Government Decision | बिग ब्रेकींग! ‘इतके’ उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी, सरकारचा मोठा निर्णय
Goverment Dicision | 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी या घोषणेची माहिती दिली. या निर्णयानुसार, 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी शुल्क माफी दिली जाईल. महाराष्ट्र सरकार या शुल्क माफीसाठी शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत करेल.
हा निर्णय जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात या उद्देशाने घेण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कुलगुरुंच्या बैठकीत या योजनेची घोषणा केली. यापूर्वी, याच कुटुंबातील मुलींना 50% शुल्क माफीची तरतूद होती. आता ती 100% पर्यंत वाढवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, “उच्च शिक्षणातील विविध कोर्सेसमध्ये मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच कुलगुरुंनी वेळेवर निकाल लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
वाचा | Farm Electricity Bill | वीजबिलाच्या धास्तीने नका होऊ कासावीस, त्वरा करा, ५०% विजमाफी योजनेसाठी उरले फक्त दिवस बावीस
राज्यपाल रमेश बैस हे कुलगुरुंच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी वेळेवर निकाल लावण्याच्या सूचना दिल्या आणि याचे महत्त्व विषद केले. “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चुकू नये किंवा नोकरीची संधी हातची जाऊ नये यासाठी वेळेवर निकाल लागणे आवश्यक आहे,” असे राज्यपाल बैस म्हणाले. उशिरा निकाल लागल्यास त्यासाठी कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता.
Web Title | Government Decision | Big Breaking! Full fee waiver for students from families with ‘so much’ income, a big decision of the government
येभी जानिये