PM Dhan Dhanya Yojana | शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार! सरकारकडून ‘पंतप्रधान धन धान्य योजने’ची घोषणा; पाहा काय होणार फायदा?
PM Dhan Dhanya Yojana | अर्थमंत्र्यांनी 2025 च्या Union Budget मध्ये शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी पंतप्रधान धन धान्य नावाची नवीन योजना(Union Budget 2025) जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळवून देणे, आणि ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. (PM Dhan Dhanya Yojana)
किती जिल्ह्यांमध्ये लागू होणार योजना?
पंतप्रधान धन धान्य नावाची योजना खास करून 100 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल, आणि त्यात राज्य सरकारांची भागीदारी असेल. योजनेचा फायदा सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना होईल, असं अर्थमंत्री म्हणाल्या. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, कमी कृषी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांमध्ये पिकांच्या खरेदीसाठी एक मजबूत आधार तयार करणे.
महिलांवर करणार लक्ष केंद्रित
या योजनेमध्ये विशेषतः तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या गटांना त्यांच्या घराच्या जवळ रोजगार मिळवून देणे, त्यांना शेतकरी म्हणून अधिक सक्षम बनवणे आणि त्यांना योग्य दरात शेतमाल विक्रीची गॅरंटी देणे हे या योजनेचे प्रमुख हेतू आहेत. केंद्र सरकार तूर, उडद आणि मसूर डाळींची खरेदी करण्यासाठी एक ठोस धोरण राबवणार आहे. यामध्ये पिकांची खरेदी किंमत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने किंमत स्थिरीकरण निधी (PSF) आणि किंमत समर्थन योजना (PSS) यांचा वापर केला जाईल.
शेतकऱ्यांना योग्य मिळणारं किंमत
शेतकऱ्यांना त्यांचे पीक बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकावे लागणार नाही, याची खात्री सरकार देईल. विशेषतः डाळींच्या उत्पादनासाठी, सरकारने 100% उडीद, तुळस आणि मसूर डाळींची खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळेल आणि त्यांनी डाळींची लागवड वाढवली पाहिजे, असा सरकारचा उद्देश आहे.
वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन खरेदीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
पंतप्रधान धन धान्य योजनेच्या माध्यमातून सरकार डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा विचार करत आहे. यामुळे भारताला डाळींच्या आयातीवर अवलंबित्व कमी होईल, आणि देशांतर्गत उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. नवीन पंतप्रधान धन धान्य योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते, असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. या योजनामुळे कृषी क्षेत्रातील सुधारणा होण्याची आशा आहे, ज्यामुळे शेतकरी अधिक समृद्ध होऊ शकतील.
हेही वाचा:
• राज्य सरकारचा मोठा निर्णय! उद्योगांसाठी ‘एनए’ परवानगीची अट रद्द; जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा







