lang="en-US"> Madhumakhi Palan | खुशखबर ! मधुमक्षिकापालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार खास प्रशिक्षण ; उद्योजकता वाढीसाठी कृषी विभागाने उचलले पाऊल … - मी E-शेतकरी

Madhumakhi Palan | खुशखबर ! मधुमक्षिकापालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार खास प्रशिक्षण ; उद्योजकता वाढीसाठी कृषी विभागाने उचलले पाऊल …

शेतकऱ्यांनी शेतीसोबत इतर जोडव्यवसाय ( Side Buisness) सुरू करावेत यासाठी सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात मधुमक्षिकापालन सुरू व्हावे यासाठी सरकार आता प्रयत्नशील झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लाखो रुपयांची तजवीत केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मधुमक्षिकापालनासाठी विशेष अभियान

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालनाकडे ( Madhumakhi Palan) वळावे यासाठी कृषी विभागाने विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात व राज्याबाहेर शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळण्यासाठी अंदाजे २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. हे अभियान चार टप्प्यात राबविण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी परिसंवाद

यासाठी नाशिकमध्ये तीन लाख रुपये खर्च करून राज्यस्तरीय परिसंवाद घेतला जातोय. तसेच सातारा, लातूर, अमरावती व नागपूरमध्ये आठ लाख रुपये खर्च करून विभागीय परिसंवाद घेतले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यवतमाळ, लातूर, पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी खास सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास राज्याबाहेर प्रशिक्षण

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालनासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. यामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा लाख रुपये खर्च करून खास राज्याबाहेर प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

उद्योजकता विकास वाढण्यासाठी पुढाकार

कृषी विभाग व फलोत्पादन विभाग मिळून या क्षेत्रातील संधी नावीन्यपूर्ण मार्गाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी धडपडत करत आहेत. या अभियानामुळे मधुमक्षिकापालनातील उद्योजकता विकास वाढू शकतो. म्हणून या विषयावर देशातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांसाठी परिसंवाद घडवून आणले जात आहेत. अशी माहिती फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Government announced campaign for madhumakhi Palan

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version