योजना

Yojana | शेती कामात अपघात झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारं 2 लाखांची मदत; जाणून घ्या योजना

Yojana | केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवल्या जातात. ज्यात पीक कर्ज (Crop loan), शेती संबंधित हजारांचे अनुदान (Subsidy) यांचा समावेश असतोच. परंतु शेतकऱ्यांचे शेतीमध्ये (Agriculture) काम करताना अपघात झाल्यावर देखील शेतकरी अपघात विमा दिला जातो. शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. ज्याद्वारे शेतकर्‍यांना अपघाती अपघाती विमा (Accident Insurance) मिळतो. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: उडीद उत्पादकांसाठी खुशखबर! मिळतोय ‘इतका’ दर; जाणून घ्या तुर, सोयाबीन आणि कांद्याचे ताजे बाजारभाव

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
तर 3 डिसेंबर 2021 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा (Insurance) योजना याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज करुन दावे केले आहेत. त्या शेतकऱ्यांचे 90 टक्के दावे निकाली काढल्यानंतरच त्यावर्षीचे पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांना दिले जाणारे बजेट निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्याचवेळी या शासन निर्णयातून ही अट हटवण्यात आली आहे. त्यासह यातील घोषणापत्र अ देखील हटवण्यात आलं आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेसाठी तब्बल 104 कोटींचा निधी मंजुर; जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

कोणाला मिळणार लाभ?
महाराष्ट्रातील वैतीधारक जवळपास 153 लाख शेतकरी आहेत त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. ज्यात मुलगा, आई, वडील, अविवाहित मुलगी नातेवाईकांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. विहिरीत पडून मृत्यू होणे, दोन हात, दोन पाय अपघातात निकामी होणे. अशा शेतकऱ्यांना दोन लाखांचा विमा मिळतो. त्याचबरोबरच शेतकऱ्यांचा एक डोळा, एक पाय अशाप्रकारे अपघात झाला असेल तर त्या शेतकऱ्यांना एक लाखांची मदत मिळते. त्याचबरोबर अपघात झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपयांची मदत मिळते.

राज्य शासनाचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार ‘इतक्या’ लाखांची मदत

किती मिळणार विमा?
• अपघाती मृत्यू- नुकसान भर्पाइची रक्कम रु.2 लाख.
• अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख
• अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.

वाचाऐकावं ते नवलचं! फक्त एका अननसाची किंमत ‘इतके’ लाख, जाणून घ्या कोणती आहे ही महागडी जात

काय आहेत आवश्यक कागदपत्रे?
• शेतकऱ्याच्या जमिनीचा 7/12 ( वहितीधारक नसेल तर कुटुंबातील सदस्याचा )
• 6 क ची नकल
6 ड (फेरफार)
• एफ. आय. आर. (FIR COPY)
• पंचनामा
• पोष्ट मार्टेम रिपोर्ट
• व्हिसेरा रिपोर्ट
• दोषारोप
• दावा अर्ज
• वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक

वाचा: बिग ब्रेकिंग! राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ, जाणून घ्या किती मिळणार रक्कम?


घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह)
• वयाचा दाखला
• तालुका कृषि अधिकार पत्र
• अकस्मात मृत्यूची खबर
• घटनास्थळ पंचनामा
• इंनक्वेस्ट पंचनामा
• वाहन चालविण्याचा वैध परवाना
• अपंगत्वाचा दाखला व फोटो
• औषधोपचाराचे कागदपत्र
• अपघात नोंदणी 45 दिवसाचे आत करणे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: 2 lakh assistance to farmers in case of accidents in agricultural work; Know the plan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button