कृषी सल्ला

खरिपात “या” पिकांना चांगला भाव; फक्त 60 ते 70 दिवसांच्या पिकामध्ये मिळवा दुप्पट उत्पन्न, करा “या” दिवसात लागवड

Good prices for "these" crops in Kharif; Get double the yield in just 60 to 70 days of harvest, make planting in "these" days

सध्या चालू असलेल्या खरीप हंगामात सुद्धा हरभरा, राजमा (gram -razma) पिके घेता येतील. बारामती-माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन या संस्थेने हरभरा, राजमा ही पिके 60 ते 70 दिवसात या खरीप हंगामात घेतले. शेतकऱ्यांसाठी ही उपयुक्त माहीत ठरण्याची शक्यता आहे. तर आपण या पिकांबद्दल सविस्तर माहिती घेऊया..

अधिक उत्पन मिळवण्याचा मार्ग-

महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन हरभरा आणि राजमा शक्यतो रब्बी हंगामात करतात. पण या कालावधीमध्ये अधिक उत्पन्न (income) मार्केटमध्ये आलेली असतात. त्यामुळे मिळणार भाव हा कमीच असतो. जेव्हा उत्पादन मार्केटमध्ये कमी जाईल तेव्हा भाव अधिक वाढले जातात. शेतकर्यांच्या फायद्याचा विचार करून उत्पन्न मिळवून देण्यासाठी, खरीप हंगामात ही पिके घेऊन अधिकचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग शेतकऱ्यांना दाखविला तो बारामती-माळेगाव खुर्द येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील शास्त्रज्ञांनी. नक्कीच हा प्रयोग शेतकऱ्याला उपयोगी ठरेल.

वाचा : SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

राजमा

या संस्थेचे यशस्वी प्रयोग – फायदे

1) खरिप हंगामात हरभरा पीक घेतल्याने अधिक उत्पन

2) उसाबरोबर हरभरा आंतरपीक चा फायदा

3) खरीप हंगामात फक्त ६५ ते ७५ दिवसामध्ये उत्पन्न काढू शकता

4) रब्बी हंगामात बियाणे उपयोग होतो

5) आॅफ सिझनमध्ये चांगला दर मिळतो.

वाचा : एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

हरभरा

सप्टेंबरमध्ये या सर्वपिकांची काढणी सुरू-

१० जून रोजी हरभरा आणि राजमा पिकाची ७४ वाणांची लागवड अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने केले होते. पाणी व खत मात्र योग्य पद्धतीने दिले असल्याने खरिपात चांगले पीक येऊ शकले. राजमा पीकही यशस्वी ठरले. सध्या या पिकांची काढणी सुरू असल्याचे संगीतले आहे.
या प्रयोगाकडे शेतकऱ्यांना वाटचाल दिसत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button