योजना

खुशखबर! शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने आणलेली कृषी यांत्रिकीकरण योजना तब्बल ‘इतक्या’ कोटीचा निधी मंजूर…

Good news! The agriculture mechanization scheme brought by the agriculture department for the farmers has been sanctioned a fund of 'itakya' crore

राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळे योजना आणत असते त्यानिमित्ताने फुल नाही तर फुलाची पाकळी शेतकऱ्यांना मदत होते. यावर्षी 2020 – 2021 साठी 38 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार कृषी विभागाने यंदा मंजूर केला आहे. यामधून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर , पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, प्रक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की शेतीसाठी चालना मिळवून देणे.राज्य सरकारनं 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.परंतु 19 कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सध्या शेती करणे खर्चिक व जिकिरीचे झाले आहे. शेती संबंधित औषधाच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. पैशाच्या अभावी शेतकरी वेळेवर शेतीची कामे करू शकत नाहीत. पारंपरिक शेती बरोबर आधुनिक यंत्रे यंत्राचा वापर केल्यास शेती सोपी जाईल.व मनुष्यबळ देखील कमी लागेल या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे.

या योजनेतून शेतकर्‍यांना खालील अवजारांचा लाभ घेता येणार आहे.
1 )ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे.
इत्यादी घटकांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. चला आपणही या योजनेचा लाभ घेऊयात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button