कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीपासून मिळणार राम राम, आता 60 ते 62 रुपयांपर्यंत मिळणार “हे” इंधन..

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) सतत वाढणाऱ्या किमती सर्वसामान्य लोकांना तसेच शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत. सरकार सर्व वाहन उत्पादकांना पुढील 6-8 महिन्यांत युरो-सहा उत्सर्जन नियमांनुसार फ्लेक्स-इंधन इंजिन (Flex-fuel engine) बनवण्यास सांगेल. फ्लेक्स-इंधन पेट्रोल (Flex-fuel petrol) आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या (methanol or ethanol) संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे. भारतीय वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल पुढील 15 वर्षात 15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. सर्व वाहन उत्पादकांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन (Flex-fuel engine) अनिवार्य केल्यानंतर वाहनांची किंमत वाढणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and diesel) उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. तसे घडल्यास इंधनाच्या किंमतीत किमान दोन ते तीन रुपयांनी घट होऊ शकते.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिन वापर –

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल (Bio-ethanol) वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

वाचा –

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश –

केंद्र सरकारने (Central Government) येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या (Petrol and ethanol) मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होईल.

हे ही वाचा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button