ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदानवर शेती उपयोगी अवजारे…

Good news for farmers! Farmers to get 90 per cent subsidy for agricultural implements

अकोला : केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबत असतात, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers’ income) वाढावावे हा त्या मागील हेतू असतो.तसेच शेतीमधून चांगले उत्पादन देखील मिळावे हा उद्देश असतो. याच उद्देशाने शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानवर शेती संबंधित औजारे मिळणार आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेस फंडातून (From the Cess Fund) रबविण्यात येणाऱ्या योजनेमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे औजारे देण्यात येणार आहे.या योजनेत सहभाग नोंदणी करण्यासाठी 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.

सेस फंडाच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात कृषी उपयुक्त साहित्य देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ 14जुलै पासून 31 जुलै पर्यंत घेता येणार आहेत, यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागत आहे.

90 टक्के अनुदान या साहित्य मिळू शकेल..

  • एच डी पी इ पाईप पुरविणे.
  • सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ग्रेडर व स्पायरल सेपरेटर पुरविणे.
  • प्लास्टिक तडपत्री 450 जी एस एम पुरविणे.
  • या वरील वस्तूच्यासाठी सर्वसाधारणपणे 90 टक्के अनुदान प्राप्त होईल, शेतकऱ्यांनी हे अर्ज पंचायत समितीमध्ये (In the Panchayat Samiti) सादर करावा.

हे ही वाचा :

1. LIC पॉलिसीला आधार कार्ड लिंक कसे कराल? ही आहे अंतिम मुदत..

2. राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button