ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांसाठी खुशखबर!! महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू भाडेखर्चात 50 टक्के पर्यंत सवलत वाचा सविस्तर बातमी..

Good news for farmer friends !! First Kisan Railway starts from Maharashtra. Read up to 50% discount on fare. Read detailed news.

भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली बाजार उपलब्ध होणार आहे यासाठी शेतीमालाच्या वाहतुकीवर पन्नास टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. रेल्वे वाहतुकीमध्ये 31 मार्च 2022 पर्यंत सवलत देणार आहे.

या निर्णयाचा शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचा उपयोग महाराष्ट्रातील डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

कमी वेळेत जास्त अंतर पार करण्यासाठी सुरक्षित स्थळी शेतीमाल पोहोचणे व शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button