ताज्या बातम्या

Anganwadi Sevika News | अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज! पेन्शन आणि ग्रॅच्युटीची योजना होणार लागू, पाहा काय होणार फायदा?

Anganwadi Sevika News | Good news for Anganwadi workers! Pension and gratuity scheme will be implemented, see what will be the benefit?

Anganwadi Sevika News | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी एका मोठ्या निर्णयाची शक्यता आहे. शिंदे सरकार लवकरच अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika News) पेन्शन आणि ग्रॅच्युटी योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लाभ मिळणार आहे.

या योजनेनुसार, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना 1 लाख 55 हजार ते 1 लाख 76 हजार रुपये पर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे. पेन्शनची रक्कम किती द्यायची यावर महिला व बालविकास विभागाकडून सल्लामसलत सुरू आहे. लवकरच येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे राज्यातील 1 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका (Anganwadi workers News) आणि 90 हजार मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांनी वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने हा मोठा निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

वाचा | Anganwadi Sevika | मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या पगारात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ, होणारं मोठी भरती

महत्वाचे मुद्दे:

  • अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युटी योजना लवकरच लागू होणार.
  • 1 लाख 55 हजार ते 1 लाख 76 हजार रुपये पर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता.
  • पेन्शनची रक्कम निश्चित करण्यावर सल्लामसलत सुरू.
  • 2 लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लाभ मिळणार.
  • मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता.
  • अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय.

हे निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेत सुधारणा करेल.

Web Title | Anganwadi Sevika News | Good news for Anganwadi workers! Pension and gratuity scheme will be implemented, see what will be the benefit?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button