आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज!
Good news: Farmers will get interest free loan up to Rs 3 lakh!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची (Of the Bankers Committee) 151वी बैठक संपन्न झाली. बैठकीत राज्याच्या 2021-22 वर्षासाठी 4 लाख 60 हजार 881 कोटी रुपयांच्या राज्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
नियमित कर्जफेड (Debt repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, डॉ पंजाबराव देशमुख या योजनेअंतर्गत (Under the scheme of Dr. Punjabrao Deshmukh) पूर्वी शेतकऱ्यांना एक लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्जे दिली जात होते, साध्या योजनेमधून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा आता 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असून बॅंकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे.
हे ही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले राज्यात “विकेल ते पिकेल” योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रावर भर देणार आहे या पार्श्वभूमीवर पिक नियोजनापासून बाजारपेठ संशोधन, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, पिकांचे मूल्यवर्धन या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांचा सर्वांगीण विकास होण्याकरता, शासन व बँकांनी एकत्र येऊन शेती क्षेत्राला अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. करता उपाय योजना करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा : सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…
कोरोनाच्या (Corona) कठीण काळातदेखील शेती क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्था भक्कम करण्याचे काम केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस देखील चांगला पडू शकतो. त्याकरता शेतकऱ्यांना शेती करता योग्यवेळी कर्ज पुरवणे गरजेचे आहे.
अल्पभूधारक (Minority holder) शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सुलभ पद्धतीने व वेळेत कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्यातील काही भागांमध्ये नागपूर, नंदूरबार, धुळे, नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांच्या सहकारी बॅंका अडचणीत असल्या तरीही नाबार्डने पुर्नवित्तपुरवठा (Refinance by NABARD) करावा. या बॅंकांना वित्तपुरवठा न झाल्यास त्या जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Deputy Chief Minister Ajit Dada Pawar) यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
1)स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…