केंद्र सरकारने (Central Government) बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendrasingh Tomar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ (Increase in base price) करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
सध्याच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून एकामागून एक कृषिविषयक निर्णय घेतले जात आहे,कृषीला प्रोत्साहन मिळण्याकरता केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हितार्थ निर्णय घेत आहे.
हेही वाचा : रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…
कृषी आंदोलनाबाबत नरेंद्र सिंह तोमर असे म्हणाले की भारत सरकारने 11 वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतात, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असतो.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा जाहीर करण्यात आली, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आधारभूत किंमतीवर LMT पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले.
पिके व त्याच्या आधारभूत किमती पुढीलप्रमाणे:
कंसामध्ये आधार किमतीमध्ये वाढ केलेली रक्कम:
धान्य (सामान्य)- 1940 रुपये ( 72 रुपये)
धान्य (ग्रेड ए) – 1960 रुपये ( 72 रुपये)
ज्वारी (हाईब्रिड)- 2738 रुपये (118 रुपये)
ज्वारी (मालदांडी) – 2758 रुपये (118 रुपये)
बाजरी – 2250 रुपये (100 रुपये)
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…
नाचणी – 3377 रुपये (82 रुपये)
मका – 1870 रुपये (20 रुपये )
तूर – 6300 रुपये – (300 रुपये)
उडीद – 7275 रुपये (79 रुपये )
भुईमूग – 5550 रुपये (275 रुपये )
सूर्यफूल बियाणे – 6015 रुपये (130 रुपये)
सोयाबीन – 3950 रुपये ( 70 रुपये)
तीळ – 7307 रुपये (452 रुपये)
कापूस (मध्यम रेशा) – 5726 रुपये ( 211 रुपये)
कपास (लांब रेशा) – 5025 रुपये ( 200 रुपये )
हेही वाचा :
1)मका’ पिकाची कशी लागवड करावी, याची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…