ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी; दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार विकतय स्वस्त दरात सोनं, पहा हे नवीन योजना.. ..

Golden opportunity to buy gold; Govt sells gold at cheaper rates on the eve of Diwali, see this new scheme .. ..

काळ बदलतोय आणि त्यानुसार सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने खरेदी करुन तुम्ही सहज गुंतवणूक करु शकता. केंद्र सरकारनं (Central Government) ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी आता डिजिटल सोनं खरेदी करुन गुंतवणूक करता येणार आहे. आजपासून रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. ही योजना पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दरानं डिजिटल सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

वाचा: महत्त्वाचे, LPG गॅस सिलेंडरवर मिळणार कॅशबॅक; बुकिंग करा व असा मिळवा रिवॉर्ड..

आजपासून रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड (Reserve Bank’s Sovereign Gold Bond) योजनेच्या सातव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. ही योजना आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच, पाच दिवसांसाठीच असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास ग्राहकांना आणखी सूटदेखील मिळणार आहे. सोनं खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. या योजनेत एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. त्याशिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात.

2 नोव्हेंबर रोजी जारी होणार बॉन्ड

या टप्प्यात ग्राहक 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करु शकतात आणि सॉव्हरिन गोल्ड बाँड 2 नोव्हेंबरपासून जारी करण्यात येणार आहेत. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) एका वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेचा हा सातवा टप्पा आहे.

किंमत –

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2021-22 च्या पुढील हप्त्यासाठी इश्यू किंमत 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.

कुठे खरेदी कराल?

जर तुम्हाला या योजनेत बाँड खरेदी करायचे असतील तर गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्टऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करु शकता. दरम्यान, लहान वित्त बँक आणि पेमेंट बँकेत याची विक्री होत नाही.

वाचाराज्यसरकारचा मोठा निर्णय; “या” विद्यार्थ्यांना आहारासाठी मिळणार रोख रक्कम, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन..

किती रक्कमेची गुंतवणूक शक्य?

जर आपण यात जास्तीत जास्त गुंतवणूकीबद्दल बोललो, तर आपण 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त ट्रस्ट किंवा एखाद्या संस्थेबाबत बोलायचं झालं तर ते 20 किग्रॅपर्यंत बाँड खरेदी करु शकतात. बाँडची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. एसोसिएशन लि. (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी क्लोजिंग प्राइज आधारावर निश्चित केली आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे :

  • या योजनेत गुतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दरानं व्याज मिळतं.
  • या योजनेत कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते.
  • या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.
  • या व्यतिरिक्त, आपण हे कोलॅटरल म्हणून देखील वापरू शकतो.
  • आपण स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेड करू शकता.
  • याव्यतिरिक्त या बाँड्सच्या सिक्योरिटीबाबतही गुंतवणूकदारांना टेन्शन घेण्याची गरज नाही.

सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड असतो. ही योजना आरबीआयच्या वतीनं जारी केली जाते. सरकानं ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. यामध्ये सोन्याच्या वजनाच्या रुपात खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

🤔 शेतीकामासाठी यंत्राचा वापर करताय? तर ही काळजी घ्या, अपघात होण्यापासून टळतील…

1️⃣ शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी; केंद्र शासनाने “ही” योजना सुरू केली, पहा योजनेविषयी सविस्तर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button