शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी; केंद्र शासनाने “ही” योजना सुरू केली, पहा योजनेविषयी सविस्तर..
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी “कुसुम योजना” (घटक-अ) सुरू केली आहे. नापीक व अकृषिक जमिनीचा वापर करून आता शेतकऱ्यांना त्यामध्ये उत्पन्न घेता येणार आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया…
वाचा –
शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मिळवण्याची संधी –
योजनेद्वारे सौरऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून किंवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्याच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.
- केंद्र सरकारची “ही” योजना पाहिलीत का? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सब्सिडी, लवकर घ्या या योजनेचा लाभ..
सुविधा –
भाग घेण्यासाठी शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था व पाणी वापरकर्ता संघटना यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तसेच या योजनेंतर्गत ०.५ ते २ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौरऊर्जा प्रकल्प प्राधान्याने विकसित करू शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा