बाजार भाव

Gold Silver Rate | सोने-चांदीच्या भावात घसरण; ग्राहकांना दिलासा , जाणून घ्या आजचे ताजे सोन्याचे दर सविस्तर …

Gold Silver Rate | fall in gold-silver prices; Reassurance to customers, know today's latest gold rates in detail...

Gold Silver Rate | दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. यामुळे ग्राहकांचा खिसा कापला गेला. मात्र, गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) भावात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, आज, 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,888 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,773 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा भाव 72,561 रुपये आहे.

गेल्या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी घसरले होते. त्यानंतर मात्र किंमतीत जोरदार वाढ झाली. तीन दिवसांत किंमतीत जवळपास 1200 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली.

चांदीतही घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीने दरवाढीत कहर केला होता. तीनच दिवसांत चांदीने 4100 रुपयांची झेप घेतली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज, 21 नोव्हेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव 72,561 रुपये आहे.

वाचा : Mobile Radiation | मोठी बातमी! मोबाईल रेडिएशनमुळे लहान मुले होतायेत गतिमंद; जाणून घ्या किती वर्षांच्या बाळाला आहे धोका?

सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार होत असतो. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत होणारा बदल. तसेच, रुपयाच्या अवमूल्यनाचाही यावर परिणाम होतो.

ग्राहकांना सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे. हॉलमार्कवर सोन्याची शुद्धता दर्शविलेली असते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

हेही वाचा :

Web Title : Gold Silver Rate | fall in gold-silver prices; Reassurance to customers, know today’s latest gold rates in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button