Gold Rate | एकदा तुळशीची लग्न झाली की, लग्न सराईचा हंगाम सुरू होतो. आता लग्नाच्या मोसमात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीतील चढ-उतार सुरूच असतात. सोन्या-चांदीचे (Silver Rate) भाव कधी वाढतात तर कधी घसरतात. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने-चांदीची (Gold Rate) खरेदी करणे केव्हा योग्य ठरणार, या संभ्रमात दागिने खरेदीदार (Financial) आहेत. चला तर मग आज बाजारात सोने आणि चांदी किती रुपयांनी विकले जात आहे ते जाणून घेऊयात.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ
सोने झाले स्वस्त
दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 53 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी (Agri News) प्रति किलो 437 रुपयांनी घसरली. शुक्रवारी सोन्याचा भाव 52700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 61900 रुपये प्रति किलोवर बंद झाला. सध्या लोकांना सुमारे 3500 रुपये प्रति 10 ग्रॅम सोने आणि चांदी 18100 रुपये प्रति किलोपेक्षा स्वस्त दराने खरेदी करण्याची संधी आहे.
ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
या व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52660 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 295 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि 52713 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले.
शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदी 437 रुपयांनी घसरून 61,829 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी चांदीचा दर प्रति किलो 566 रुपयांच्या वाढीसह 62,266 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
अशाप्रकारे शुक्रवारी 24 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52,660 रुपयांना 10 ग्रॅम मिळत झाले. तर 23 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52,449 रुपयांनी मिळतंय. 22 कॅरेट सोने 48 रुपयांनी स्वस्त होऊन 48,237 रुपयांना मिळतं आहे, 18 कॅरेट 40 रुपयांनी स्वस्त होऊन 39,495 रुपयांना आणि 14 कॅरेट सोने 31 रुपयांनी स्वस्त होऊन 30806 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोने 3500 रुपयांनी तर चांदी 18,100 रुपयांनी स्वस्त
सोने सध्या 3,540 रुपये प्रति 10 ग्रॅमने आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 18,151 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79,980 रुपये प्रति किलो आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द; आता शेतकऱ्यांच्याही पैशांना लागणार चुना
- झोपून खा नायतर लोळून! फक्त नावावर जमीन पाहिजे गड्या; वर्षाला मिळणारं तब्बल 75 हजार, जाणून घ्या कसं?
Web Title: Good news for customers! Gold and silver became cheaper by rupees; Buy before the golden opportunity is gone