ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Gold Rate | सोने खरेदीची सुवर्णसंधी! दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

Gold Rate | सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण दिसून येत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा चांदीची किंमत (Silver rate) अधिक घसरली आहे. भारतीय वायदे बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात (Transaction) हाच कल दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत (Gold Rate Today) 0.75 टक्क्यांनी घसरली आहे. आज चांदीच्या किमतीत (Finance) मोठी घसरण झाली असून एमसीएक्सवर ती 2.04 टक्क्यांनी घसरली आहे.

वाचा: पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार तब्बल 15 लाख; जाणून त्वरित करा अर्ज

सोने दर
सोमवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Rate) सकाळी 9:10 वाजता 392 रुपयांनी घसरून 51,585 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याचा भाव आज 51,685 रुपयांवर उघडला गेला. उघडल्यानंतर, किंमत एकदा 51,540 रुपये होती. थोड्या वेळाने तो 45 रुपयांनी वाढून 51,585 रुपयांवर पोहोचला.

त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर 1,239 रुपयांनी घसरून 59,546 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 60,000 पासून सुरू झाला. एकदा किंमत 59,501 रुपये झाली. पण, काही काळानंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत 59,546 रुपयांवर व्यवहार सुरू झाली.

वाचा: जनावरांची गर्भधारणा तपासण्यासाठी प्रेग्नेंसी किट विकसित! केवळ ‘इतक्या’ दिवसांतच होणार खात्रीशीर तपासणी, जाणून घ्या सविस्तर

जागतिक बाजारात घसरण
जागतिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. शुक्रवारीही सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला होता. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा स्पॉट भाव आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाला आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Golden opportunity to buy gold! Gold-silver prices fall on Diwali; Find out the new rates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button