शेळी जंगलातले वणवे आटोक्यात आणू शकते; ऐका मेंढपाळ महिलेने केले संशोधन,
जंगलामध्ये लागलेले अचानक वणवे कसे विझवता येतील? यावर ऐका पश्चिम अमेरीकन महिलेने तोडगा काढलेला आहे. आपण पाहतो की जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे जीवित हानी नुकसानास सामोरे जावे लागते. वनव्यांमुळे कित्येक पशु, प्राण्यांच्या (Animals) जीव गमवायला लागल्याचे आपण पाहिले देखील आहे. यामुळे पर्यावरण (Environment) हानीच्या समस्यांही जाणवू लागतात. या अचानक लागलेल्या वणवे लगेच थांबवणार कसे आणि कोण? यावर पश्चिम अमेरिकन महीलेने तंत्र (Mechanism) शोधले आहे. जे वणवे रोखण्यासाठी प्रभावी पडेल. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया…
वाचा –
गोटापेली फाउंडेशनची स्थापना –
पश्चिम अमेरिकन ऐका मेंढपाळ महिलेने (Shepherd woman) वणवे कसे रोखता येईल याचा शोध घेतला आहे. या महिलेने सांगितले आहे की एक शेळी जंगलामध्ये लागलेला वणवा आटोक्यात आणू शकते. ती कशी पाहुया..लॅनी मॅल्मबर्ग या अमेरिकन महिलेने कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीतून तण विज्ञान (Weed Science) या विषयात पदवी मिळवली आहे. गेल्या वर्षी शेळ्यांचा वापर वणवा रोखण्यासाठी ब्युरो ऑफ लँड मॅनेजमेंटने (Bureau of Land Management) मॅल्मबर्ग यांनी यांच्याशी संपर्क साधला. लॅनी मॅल्मबर्ग यांनी 2020 मध्ये गोटापेली फाउंडेशनची स्थापना (Establishment of Gotapelli Foundation) देखील केली आहे. शेळीचा वापर वणवे रोखण्यासाठी कसा केला जातो? यावर प्रशिक्षण दिले जाते.
शेळी पालापाचोळा नष्ट करते –
शेळीसारखा प्राणी (Goat animals) गवत, वाळलेली पानं खातो. जंगलात किंवा आपल्या आजूबाजूला असलेला पाचोळा शेळी (Goat) खाऊन नष्ट करत असते. या वाळलेल्या फांद्यांमुळे जंगलात आग पसरण्याचा धोका असतो. शेळीने ती पानं सर्व खाऊन टाकल्यामुळे आग पसरण्याचा धोका जवळपास 50% कमी होतो. मॅल्मबर्ग यांनी सांगितले आहे की त्यांच्या शेळ्या दिवसभर चारा खाल्ल्यावर जमिनीतच मलविसर्जन करतात. त्यांची विष्ठा खूपच उपयुक्त असते. यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. व पाणी धारण क्षमता वाढली की आग लागायचे प्रमाण कमी होत असते.
वाचा –
स्पिरुलिना शेती ठरेल शेतकऱ्याला फायदेशीर; पहा या शेतीची प्रक्रिया व काढणी..
आग मातीतुन रोखता येऊ शकते –
आग, वणवे लागल्यानंतर पाण्याच्या सोयीचे नियोजन करावे लागते. या परिस्थितीमध्ये प्रचंड धावपळ होते. पण खरं तर मातीविषयी उपाययोजना केल्या पाहिजेत. या महिलेने सांगितले आहे की मातीतले रासायनिक घटक 1 टक्क्याने वाढवले तर ती प्रतिएकर 16,500 गॅलन अतिरिक्त पाणी रोखून धरू शकते. लॅनी मॅल्मबर्ग (Lanny Malmberg) व त्यांच्या टीमने संशोधनात हे स्पष्ट केले आहे. यावर विचार केला तर नक्की भविष्यातले वणवे रोखता येऊ शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा
“या” बँकेमध्ये फाटलेल्या, जळालेल्या नोटा बदलून मिळणार; नोट परतावा नियम जाहीर..