शेती म्हंटलं तर पिकांवर कीड ही आलीच. आज आपण अशाच एका केळी बद्दल बघणार आहोत जी आले या पिकावर नुकसानदायी असते.हा प्रादुर्भाव शेतामध्ये साठवून ठेवलेल्या आल्यावर सुद्धा होतो. मात्र, सध्याच्या स्थितीमध्ये शेतात मुंगळ्याच्या आकारांचे कंदमाशी यांची प्रौढ उडतांना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना आज आपण बघणार आहोत.
कशी असते कंदमाशी?
कंदमाशी पाळी सध्या महाराष्ट्रामध्ये अद्रक आणि हळद ह्या पिकांवर खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. यामुळे त्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कंदमाशी ही मुंगळ्याच्या आकाराची काळसर रंगाची असून तिचे पाय शरीरापेक्षा लांब असतात.
अळी हे पिवळसर पांढरी बिन पाण्याची व डोक्याकडे निमुळती होत गेलेली आठवण येते. कंदमाशीची अळी ही पिकासाठी खूप हानिकारक असते. बड्या कंदामध्ये शिरकाव केल्यामुळे पीथिएम, फ्युजॅरियम या बुरशीजन्य रोगांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यानंतर हे कंद म्हणजे हळद आणि आलं हे भाऊ कडून कुजून जातात. आणि त्यानंतर झाडाची पाने पिवळी पडून संपूर्णपणे झाड वाळून जातात.
जीवनक्रम केवढा असतो??
कंदमाशी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात आढळून येते. मादीं माशी मातीच्या लहान ढेकळं खाली ,जमिनीच्या भेगांत किंवा पृष्ठभागावर एकेकटी किंवा समूहाने अंडी घालते .आणि त्या अंड्यातून दोन ते पाच दिवसांनी अळ्या बाहेर पडू लागतात. त्या गंधान मध्ये शिरून आपली उपजीविका करतात. त्यांची 13 ते 18 दिवसात संपूर्णपणे वाढ होऊन त्या प्रौढ होतात आणि त्या दहा ते पंधरा दिवसात कोषा व्यवस्थित येतात. आणि नंतर ती माशी बाहेर पडते अशा प्रकारे चार आठवड्यात ही माशी संपूर्ण वाढून जीवनक्रम पूर्ण होतो.
व्यवस्थापन कसे करावे?
हंगाम संपल्यानंतर शेतीतील शिल्लक राहिलेले कंद कीडग्रस्त करणे व त्याचे अवशेष जमा करून त्यांना जाळून नष्ट करावे.
प्रादुर्भाव ग्रस्त कंदांची साठवणूक मुळीच करू नये.
लागवडीसाठी निरोगी कंदाची निवड करावी.
जास्त प्रादुर्भाव झालेल्या साठवणुकीतील कंद वेगळे करून नष्ट करावे.
पिकांची फेरपालट करावी आले पिकानंतर पुन्हा आले किंवा हळद पीक त्या जमिनीमध्ये घेऊ नये.
शेतात उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावे.
फवारणी करायची का? आणि करायची तर कुठली?
आले पिकाच्या साठवणी अगोदर आणि लागवडीपूर्वी ती क्विनाॅलफाॅस (२५ % प्रवाही)तीन मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे तयार केलेल्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवावीत.
जमिनीतून फ्लोरपायरीफाॅस ( ५० %) पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.
जुलै ते ऑक्टोबर दरम्यान 15 दिवसांच्या अंतराने क्विनाॅलफाॅस (२५ %) दोन मिनी किंवा डायमिथोएट (३० टक्के) एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
WEB TITLE: Ginger crisis on ginger and turmeric crops; Knowing how to cope with the aggressive attack of the tuber …