Lifestyle

Spicy Tea| (Lifestyle) सुगंधी आणि मसालेदार चहा बनवायचंय? घरीच बनवा चहा मसाला|

Spicy Tea| चहा: अनेकांसाठी दिवसाची सुरुवात आणि दुपारची ऊर्जा (Energy) टिकवून ठेवण्यासाठी गरजेचा आहे. नुसते पाणी उकळून आणि त्यात दूध घालून बनवलेला चहा पिणं कधी कधी थोडं कंटाळवाणं होऊ शकतं. मग अशा वेळी काय करायचं? तर मसालेदार आणि सुगंधी चहा बनवा| (Lifestyle)

घरीच बनवलेला चहा मसाला तुमच्या चहाची चव आणि सुगंध (fragrance) तर वाढवेलच, शिवाय त्यात मसाल्यांचे फायदेही मिळतील.

चहा मसाला (Lifestyle) बनवण्यासाठी लागणारी साहित्ये:

  • अर्धा टेबलस्पून लवंग (cloves)
  • 1 टेबलस्पून मिरी
  • दालचिनीचे 2 छोटे तुकडे
  • 2 टेबलस्पून वेलची
  • 2 मसाला वेलची
  • अर्धे जायफळ
  • 2 चमचे सुंठ पावडर
  • अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर
  • 2 चमचे बडिशेप
  • खडीसाखरेचा 1 लहान तुकडा

वाचा:Akola|: बाजारपेठेत हरभऱ्याचा दर ६१०० रुपयांपर्यंत, तुरीचा दर ११ हजारांवर!

कृती:

  1. एका कढईत लवंग, वेलची, मिरे, दालचिनी, जायफळ (nutmeg) आणि बडिशेप मंद आचेवर थोडे भाजून घ्या.
  2. मसाला वेलची (टरफलं काढून) टाका आणि थोडा वेळ भाजून घ्या.
  3. मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाका. (Lifestyle)
  4. त्यात ज्येष्ठमधाची पावडर, सुंठ पावडर आणि खडीसाखरेचा तुकडा घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
  5. चहा बनवण्यासाठी पाण्याची पातेली उकळायला ठेवा.
  6. त्यात 1 चमचा चहा मसाला, चहापावडर आणि साखर घालून चांगला उकळ घ्या.
  7. उकळी आल्यावर दूध घाला आणि चहा टपरीत गरम गरम चहा सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button