आर्थिक

Subsidy | बिग ब्रेकींग! महाडीबीटीवर फक्त २३.६० रुपये अन् ‘ही’ चार कागदपत्रे भरून शेतकऱ्यांना मिळणार १ लाख ५० हजार, जाणून घ्या सविस्तर

Subsidy | जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये वैयक्तिक शेततळे बांधण्याची इच्छा वाढली आहे. या योजनेचा (Subsidy) लाभ घेण्यासाठी जानेवारी २०२३ ते २० मे २०२४ या काळात जिल्ह्यातील एक हजार ६४४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी १ एप्रिल ते २० मे या पावणेदोन महिन्यातच एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.

शेततळ्यासाठी अनुदान
३० बाय ३० आणि ३४ बाय ३४ साईजच्या शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. याशिवाय, शेततळ्यात अस्तरीकरणासाठीही ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळते.

अर्ज कसा करावा?
वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी आधारकार्ड, बॅंक पासबुक, हमीपत्र आणि सातबारा उतारा यासह इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. ऑनलाइन अर्जासाठी २३ रुपये ६० पैसे शुल्क आहे.

वाचा:HSC SSC Result | महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचे निकाल लवकरच जाहीर होणार!

महत्वाची माहिती

  • शेतकऱ्यांना महा-डीबीटीच्या https://mahadbtmahit.gov.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.
  • आधार क्रमांक बॅंक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी अर्जातील वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

शेती विभागाचे काम उत्तम
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या कृषी विभागाचे काम अतिशय उत्तम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button