नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…
Get Grants from 'Ya' Scheme for Repair of New Wells and Old Wells, Apply Online
शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार (Central and State Governments) नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ (Water supply) होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण,(Plastic lining of farms) ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana) राबवणे झाली आहे.
या योजनेअंतर्गत (Under the scheme) नवीन विहीर (New well) तयार करण्याकरिता अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होते, तसेच जुन्या विहिरीचे नूतनीकरण (Renovation of old wells) करणे किंवा दुरुस्ती करण्याकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, इन वेल बोरिंग 20हजार, पंप संच 20हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1लाख व सूक्ष्म सिंचन संच, (Micro irrigation set) ठिबक सिंचन, संच 50 हजार किंवा तुषार सिंचन संच 25 हजार पीव्हीसी पाईप 30 हजार, परसबाग 500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाते.
पात्र असणारे जिल्हे:
ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते परंतु मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली नाही.
कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :
योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटला भेट द्या .
उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय उपलब्ध असेल तिथे पर्यायावर क्लीक करा तो तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा.
शेतकरी योजना (Farmers Scheme) हा पर्याय निवडा. मग पर्याय निवडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ यावर क्लिक करा.
या योजनेबाबत अनुदान पात्रता या सर्वांची माहिती दिसेल.
उजव्या कोपऱ्यात नवीन ‘अर्जदार नोंदणी’ (Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
त्यानंतर अर्ज करण्याकरिता अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा. लॉगिन प्रकार निवडून वापर ‘कर्ता आयडी’ किंवा ‘आधार क्रमांक’ (Aadhaar Number) टाका.
“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…
त्यानंतर ‘प्रोफाईल स्थिती’ (Profile Status) हे वेब पेज ओपन होईल.
तिथे ‘अर्ज करा’ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होइल त्यामध्ये शेवटचा पर्याय अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना (Special scheme for farmers) या पर्यायावर क्लिक करा.
बटाट्याची लागवड करताना घ्या ही काळजी.
त्यापुढे उजव्या कोपऱ्यात बाबी निवडा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
घटक निवडा या पर्यायावर तुम्हाला हवा तो ऑप्शन (Option) निवडा किंवा तुम्हाला कोणत्या कामाकरिता अनुदान हवे आहे, तो पर्याय निवडा उदाहरण: जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, ठिबक सिंचन संच, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यास अस्तरीकरण, (Lining the farm) नवीन विहीर इ. एक वेळेला एकच पर्याय निवडू शकता.
त्यानंतर जतन करा पर्यायवर क्लीक करा. Ok बटन वर क्लीक करा.
यानंतर तुम्हाला सोडत पद्धतीने म्हणजे लॉटरी (Lottery) पद्धतीने तुमचे नाव जाहीर होईल नाव जाहीर झाल्यास कागदपत्रे जमा करा. अर्ज करण्याकरिता कागदपत्रे (Documents) आवश्यकता नसते.
हे ही वाचा:
1)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…
2)टॅक्टर घेणे होणार महाग! ट्रॅक्टर दरवाढ होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणे…