महत्वाच्या घडामोडीचा झटपट आढावा फक्त एका क्लिकवर पहा दिवसभराच्या बातम्या…
Get a quick overview of important events with just one click.
पुणे, सातारा आणि रत्नागिरीला आज (17 जून) हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.
हेही वाचा : पावसाळ्यामध्ये कोमड्यांची घ्या अशी काळजी ;
उदयनराजेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच जुलैपर्यंत अल्टिमेटम, मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य करण्याची मागणी
नाशिक जिल्हातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : मधाचे फायदे वाचा सविस्तर पणे
सोलापुरातल्या बार्शी इथल्या एका शेतकऱ्याने दाखवून दिलेय. साधारणतः अति उष्ण कटिबंधात उत्पादन घेण्यात येणाऱ्या खजूर पिकाची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचा नफा राजेंद्र देशमुख या शेतकऱ्यानं मिळवलाय.
मिरचीची वाढती मागणी लक्षात घेता विक्रेते आणि शेतकऱ्यांना किमान 10 ते 20 टक्के मिरचीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी…
कसं ओळखताल खतातील बनावटपणा; अतिशय सोप्या पद्दतीने ओळखा…
भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…