कृषी तंत्रज्ञान

Genetically Modified | जीएम वाणाला मिळाली मान्यता! या वाणा मुळे शेतकऱ्यांना होतील अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर…

Genetically Modified | जीएम (Genetically modified) वाणाला देशातील बायोटेक रेग्युलेटर जेनेटिक इंजिनीअरिंग मूल्यांकन समितीनं (GEAC) मान्यता दिली आहे. दिल्ली विद्यापीठाने हे वाणा विकसित केलं आहे. जीएम म्हणजे नेमकं काय? त्याला मान्यता कशी मिळते? याबाबतची माहिती कृषी अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल घनवट आणि डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

जीएम म्हणजे काय ? :

जेनेटिकली मॉडिफाय म्हणजेच असलेल्या पिकांच्या जनुकांमध्ये सुधारणा करून विशिष्ट दर्जाची बियाण तयार केली जातात त्याला जीएम म्हणतात. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी दिलीय. उदाहरणाद्वारे नवले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की; एखादा गहू कमी पाण्यात येतो, त्याच कमी पाण्यात येण्याचं एक सुत्र घेतलं. दुसरा गहू म्हणजे जो विशीष्ट प्रकारच्या आळीला प्रतिकार करतो. त्या गव्हामधून अळीला प्रतिकार करणारं सुत्र घेतलं. या दोन्ही गव्हामधून चांगलं वाण विकसीत करणं म्हणजेच जीएम असल्याचे नवले यावेळी म्हणाले.

वाचा: Agricultural Technology | भारीचं की! आता शेतकरी वीज व पाण्याच्या बचतीसह करू शकणार शेती, जाणून घ्या कशी?

पर्यावरणवाद्यांचा आक्षेप; प्राण्यांचे जनुके वनस्पतीमध्ये टाकल्यास कॅन्सर होण्याची शक्यता

प्राण्यांचे जनुके वनस्पतीमध्ये टाकण्याचे संशोधन काही ठिकाणी सुरू झालंय. ते जनुके वनस्पतीमध्ये टाकण्याचे संशोधन सुरू झालेय. परंतु पर्यावरणवाद्यांनी त्यावर आक्षेप घेतलाय. प्राण्यांचे जनुके टकल्यानं पर्यावरणाला धोका होऊ शकतो. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवलीये.

जीएम वाणांना मान्यता देण्यासाठी काय दक्षता घ्यावी..

जीएम वाणा शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचं आहे अस ते म्हणाले. पिकांमध्ये विशिष्ट सुधारणा करून विशिष्ट दर्जाची बियाण तयार करणे म्हणजे जीएम होय. जीएम बियानांना मान्यता देताना मनुष्य आणि प्राणी यांना कोणताही धोका होणार नाही अशी दक्षता घ्यावी.

जीएम वाणा ठरवताना नेमकं काय पाहिलं जात:

प्राण्यांसाठी योग्य आहे का हे पहिलं जात. यात कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे याचाही विचार केला जातो. त्याचबरोबर हे मानवी शरीराला घातक नाही याचाही विचार केला जातो. त्याच्या सर्व चाचण्या करुन परवानगी दिली जात असल्याची माहिती अनिल घनवटांनी दिलीय.

BT कापासाला सरकारनं दिला हिरवा कंदील:

सरकारनं फक्त BT कापूस एक आणि BT कापूस दोन या वाणांनाच परवानगी दिली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली. HTBT कापासाला मान्यता मिळाली ; परंतु परवानगी मिळाली नाही.

जीएम वाणा फायद्याचं :

जीएम वाणांनी परवानगी मिळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचे आहे. फवारणी केल्यावर पिकांवर कोणताही धोका निर्माण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये. उत्पादन खर्च कमी येईल. फवारणी करुन पीक चांगलं येईल अशी माहिती अनिल घनवट यांनी दिली.

या जीएम वाणांना मिळावी परवानगी – अनिल घनवट:

पिकावर पडणारे रोग आणि कीड नियंत्रण करणं देखील यामुळं शक्य होते. मोहरी कापसाबरोबरच हरभरा, सोयाबीन, मका, पपई, सफरचंद या पिकांच्या जीए वाणांना देखील परवानगी मिळावी असे अनिल घनवट म्हणाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button