ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ganja Taskari | अरे बाप रे! या जिल्ह्यात 1 कोटी 40 लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक..

Ganja Taskari | Oh father! Ganja worth 1 crore 40 lakhs seized in this district, farmer arrested..

Ganja Taskari | बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुका मध्ये हत्ता शिवारातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून 1 कोटी 40 लाखांचा गांजा (Ganja Taskari) जप्त केला आहे. याप्रकरणी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल धुमा चव्हाण या शेतकऱ्यानं माळरानावर तीन एकरात गांजाची लागवड केली होती. त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी चव्हाण यांच्या शेतात 300 ते 400 गांजाची रोपं आढळून आली. त्यांची किंमत अंदाजे 1 कोटी 40 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठाचा खडा: अवघे 52.99 रुपये नुकसान भरपाई!

पोलिसांनी गांजाची रोपं जप्त केली आणि चव्हाणला अटक केली. चव्हाणवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही लोणारमध्ये अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

Web Title : Ganja Taskari | Oh father! Ganja worth 1 crore 40 lakhs seized in this district, farmer arrested..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button