11 days गणपती बाप्पा पुढच्या वर्षी ११ दिवस लवकर येणार
11 days ठाणे: गणपती बाप्पाचा निरोप (Farewell) घेत असतानाच पुढच्या वर्षी गणेशोत्सव लवकर येणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ साली गणेश चतुर्थी ११ दिवस लवकर म्हणजेच बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाच्या तारखांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. २०२४ मध्ये गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर रोजी साजरी झाली होती. मात्र, पुढच्या वर्षी बाप्पा आपल्या भक्तांना लवकर भेटणार आहेत. यामुळे गणेशोत्सवाची उत्सुकता आणखीन वाढली आहे.
पुढील काही वर्षांतील गणेश चतुर्थीच्या तारखा:
- २०२५: बुधवार, २७ ऑगस्ट
- २०२६: सोमवार (monday), १४ सप्टेंबर
- २०२७: शनिवार, ४ सप्टेंबर
- २०२८: बुधवार, २३ ऑगस्ट
- २०२९: मंगळवार, ११ सप्टेंबर
- २०३०: रविवार, १ सप्टेंबर
- २०३१: शनिवार, २० सप्टेंबर
- २०३२: बुधवार, ८ सप्टेंबर
- २०३३: रविवार, २८ ऑगस्ट
- २०३४: शनिवार, १६ सप्टेंबर
- २०३५: बुधवार, ५ सप्टेंबर
वाचा : Lifestyle आले: वजन कमी करण्याचा अचूक उपाय!
गौरी-गणपती विसर्जन:
पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन (Immersion) मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे.
या बातमीने गणेश भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार असल्याने भक्त आधीपासूनच उत्सवाच्या तयारीला लागले आहेत.