ताज्या बातम्या

Ganapati Visarjan Muhurta | लाडक्या बाप्पाला निरोप! कधी आहे गणपती विसर्जन शुभ मुहूर्त? जाणून घ्या विसर्जनाचे नियम

Goodbye dear father! Ganpati Visarjan auspicious time and know rules of Visarjan

Ganapati Visarjan Muhurta | गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आज अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाचीही पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

अनंत चतुर्दशीचा नियम
गणपती विसर्जनाच्या दिवशी कुटुंबासह पूर्ण विधीपूर्वक बाप्पाची पूजा करावी. त्यांना लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, बेसनाचे लाडू, सुपारी, अगरबत्ती इत्यादी वस्तू अर्पण करा. शक्य असल्यास या दिवशी हवन करावे. यानंतर गणपतीची भव्य आरती करावी. बाप्पाला निरोप देताना त्याला रिकाम्या हाताने निरोप देऊ नये. बाप्पाच्या हातावर लाडू किंवा मोदक ठेवावा. गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे घरातीलच टबमध्ये विसर्जन करू शकता. माती विरघळली की ते पाणी कुंडीत ओतावे. बाप्पाला निरोप देताना, पुढच्या वर्षी परत येण्याची प्रार्थना करा. तसेच विसर्जनाच्या वेळी स्वच्छतेची काळजी घ्यावी. त्यांना पूर्ण आदराने निरोप द्या आणि या दिवशी काळे कपडे घालू नका.

वाचा : Marathi Boards | मोठी बातमी! दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश; जाणून घ्या कधीपर्यंत आहे मुदत?

अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्त
06:12 ते 07:42
10:42 ते 12:11
12:11 ते 01:30
04:41 ते 06:1
राहू काल – दुपारी 01:30 ते 03:20 पर्यंत

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करताना या गोष्टींची काळजी घेतल्यास बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला भेटण्यासाठी येतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Goodbye dear father! Ganpati Visarjan auspicious time and know rules of Visarjan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button