Goat rearing| गडचिरोलीतील महिला पशुपालकाचे यश: जिद्द आणि कठोर परिश्रमाने मिळवले यश|
Goat rearing| गडचिरोली: व्यवसाय करण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी केवळ पैसा पुरसा नाही, तर जिद्द आणि कठोर परिश्रमही गरजेचे आहेत. हच सिद्ध केले आहे गडचिरोली जिल्ह्यातील घोट परिसरातील मकेपल्ली माल येथील जोशीला गुरुदास बोधलकर या महिला पशुपालकाने. त्यांच्या यशस्वी शेळीपालन (Goat rearing) व्यवसायामुळे इतर महिलांसाठी प्रेरणा मिळते आहे.
मकेपल्ली माल गावात उमद अभियानांतर्गत ३० महिला गट स्थापन करण्यात आले आहत. या अभियानांतर्गत महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. शारदा समूहातील जोशीला यांनी याच अभियानाचा लाभ घेत १० हजार रुपये बँकेचे कर्ज आणि समुदाय गुतवणूक म्हणून १० हजार रुपये कर्ज घेतले. या रकमेतून त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. हळूहळू व्यवसायात वाढ होत गेली आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (life promotion) अभियानाच्या माध्यमातून गावात पशुसखी म्हणून कुंदा खुशाल सोनटक्के यांची निवड करण्यात आली. त्यांनी पशुसखी म्हणून शेळ्यांचे लसीकरण, पोषण आणि स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात कली.
आज जोशीला यांच्याकडे ४० शेळ्या आणि १० बोकडे आहेत. दरवर्षी ते एक ते दीड लाख रुपयांचे बकर विकतात. घरीच भरपूर शेळ्या असल्याने त्यांना आता मजुरीसाठी जाण्याची गरज उरली नाही. या कामात त्यांना ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या प्रभाग समन्वयक सविता खोब्रागडे, तालुका अभियान व्यवस्थापक (manager) तुषार करणे, पशू व्यवस्थापक प्रीती वडे आणि कुंदा सोनटक्के यांची मदत मिळत आहे.
वाचा: Orange alert| महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी, काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी
जोशीला यांनी पूर्वी मजुरी करून जीवन जगायचे होते. मात्र, सतत मजुर करण्यापेक्षा काहीतर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यातच त्यांना शेळीपालनाची माहिती मिळाली. गावासभोवताल असलेल्या मोकळ्या जागेत शेळ्यांना मुबलक प्रमाणात चारा मिळतो. त्यामुळे हा व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पन्न देऊ शकतो हे लक्षात आल्याने त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा हा व्यवसाय (Business) इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जोशीला यांच्या यशस्वी कथा आपल्याला शिकवत की यशस्वी (successful) होण्यासाठी पैसा हा एकमेव घटक नाही. जिद्द, कठोर परिश्रम आणि मार्गदर्शन मिळाल्यास आपणही यशस्वी होऊ शकत.