कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या 15 दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार निधी- कृषिमंत्री

Crop Insurance | देशातील निम्म्याहून अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर (Agricultural Business) अवलंबून आहे. एकंदरीत शेती व्यवसायाला प्रमुख व्यवसाय (Business) म्हणून संबोधले जाते. मात्र, शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याच कारणास्तव केंद्र आणि राज्य सरकार विविध माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) मदत करत असते. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक (Insurance) मदत दिली जाणार आहे. याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

वाचा:पीएम किसानचा 12वा हप्ता अडकलाय? आता 13वा हप्ता अडकण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…

ज्या ज्या वेळी राज्यातील शेतकरी नुकसानीला किंवा विविध संकटांना सामोरे जात असतात. त्या त्या वेळी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Department of Agriculture) वेळोवेळी मदत करण्यात येते. यंदा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

बिग ब्रेकिंग! फळबाग लागवडीसाठी तब्बल 104 कोटींचे अनुदान मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची हीच आर्थिक (Crop Insurance) पोकळी पूर्ण करण्यासाठी सरकार धडपड करत आहे. तसेच या नुकसान भरपाईपासून राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आश्वासन देखील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विजेचा शॉक; ‘या’ शेतकऱ्यांची धडाधड वीज कापण्याचे निर्देश

येत्या 15 दिवसांत होणार निधीचे वाटप
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, “यंदा विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी जवळपास 12 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच मदतीचे वाटप करण्यात येत आहे. तर येत्या 15 दिवसात सर्व मदतीचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात येईल.” आता या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Funds will be deposited in the accounts of the victims in the next 15 days – Minister of Agriculture

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button