Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार कमी उत्पन्न असलेल्या लोकांना पक्के घर बांधण्यासाठी मदत करते. शहरी भागातील लोकांना ही मदत प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) द्वारे मिळते. तर ग्रामीण भागातील लोकांना ही मदत प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे मिळते. जर तुम्हीही यासाठी नोंदणी (Financial) केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कोट्यवधींच्या निधी वितरणास मंजुरी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 16 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामान्यांना (Farming) मोठा दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (Insurance) ग्रामीणसाठी 2022 आणि 2023 साठी पहिल्या हप्त्यापोटी तब्बल 816 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना लवकर मिळणार घरकुलाची रक्कम
आता हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे जलद गतीने योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठीची रक्कम मिळणार आहे. यामुळे राज्यामध्ये जलद गतीने या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले बनणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या डोक्यावरचे छप्पर मजबूत व्हायला मदत होणार आहे.
अमृत महा आवास योजना
राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामान्य नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा, जास्तीत जास्त नागरिक पात्र व्हावे, तसेच नागरिकांना या घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी अमृत महाआवास अभियान राबवले जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांना घरकुलाचा लाभ व्हावा म्हणून हे एक अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी जलद गतीने प्रयत्न सुरू आहेत. याचं पार्श्वभूमीवर शासन निर्णय घेऊन तब्बल 816 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Web Title: Good news! Funds of crores have been distributed to the beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: