“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा होणार, 7 लाखाहून अधिक अतिवृष्टीग्रस्त शेतकरी पात्र..
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचे (farmers) भरपूर प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई सरकार शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे 5 लाख 24 हजार 655 हेक्टरावरील खरीप पीक पूर्णपणे बाधित झाले. या नुकसानीच्या (Crop loss) मदतीसाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख 61 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. आजपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यात ही मदत जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.
वाचा –
- मोठी बातमी; शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची ने-आण करण्यासाठी रेल्वेकडून ५०% अनुदान, सुविधा पहा सविस्तर….
जमिनीबरोबर पिकांचेही नुकसान-
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने काढणीला आलेले खरीपाचे पीक पूर्णपणे वाहून गेले होते. काही शेतकऱ्यांच्या तर अवघ्या जमिनीच खरडून निघाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त वाढीव मदत जाहीर केली. त्यातील 75 टक्के रक्कम जिल्ह्यांना वितरीतही केली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला 416 कोटी 54 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
वाचा –
हा निधी सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांना गुरुवारी वितरीत करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. आज हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र असे असले तरीही ज्या तालुक्यांनी लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे, तेथे आजपासूनच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –