ताज्या बातम्या

गडकरी साहेबांकडून आले पुणेकर,नगरकरांना मोठे गिफ्ट; इथे उभारणार सहापदरी उड्डाणपूल

From Gadkari Saheb came Punekar, big gift to Nagarkar; Sahapadari flyover to be built here

पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी कोंडी लवकर संपुष्टात येणार आहे, कारण केंद्र सरकारने कात्रज जंक्शन च्या परिसरात सहापदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा उड्डाणपूल पुणे शहर,मुंबई,बंगलोर बाह्यवळण आणि पुणे-सोलापुर मार्गाला जोडण्यात येईल. त्यासाठी 169.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याची घोषणा नुकतीच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून करण्यात आली.

कात्रज जंक्शन वर उभारण्यात येणारा हा पूल 1326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज कोंढवा रोड चे रुंदीकरणाचे काम देखील हाती घेतले आहे

✍️ तसेच नगरकरांना देखील सुखद दिलासा:

नाव्हारा,इनामगाव,काष्टी,श्रीगोंदा,जळगाव ,जामखेड या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे,या मार्गावरील आढळगाव ते जामखेड ह्या मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी 399 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे. एवढेच नव्हे तर नगर-सोलापूर या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामगार कामात आढळणारी अडचणीत देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे.

नगर -सोलापूर -आढळगाव ते जामखेड दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासाला महत्वपूर्ण वळण देणारे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button