आजपासून मोफत लसीकरण सुरू! जाणून घ्या लसीकरणासाठी काय आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती…
Free vaccinations start today! Learn more about what is needed for vaccination
आज पासून संपूर्ण देशामध्ये 18 वर्षे पुढील नागरिकांना मोफत लसीकरण देणेत येणार आहे. कोव्हिड 19 विरुद्ध (Covid-19) च्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता लसीकरण करण्याकरिता Co-Win अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही.
त्यामुळे लसीकरण कार्यक्रमाला अजून वेग येऊ शकतो. हे लसीकरण खाजगी दवाखाने तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने खासगी रुग्णालयातील लसींच्या किमती निश्चित केलेल्या आहेत,कोवॅक्सिन लसीसाठी ₹1,410, कोविशील्ड लसीसाठी ₹790 आणि स्पुतनिक V या लसीसाठी ₹1,145 ही किंमत निश्चित करण्यात आली आहे.
Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…
कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला चिकटले नाणी व स्टीलच्या वस्तू पहा काय केला आहेत या व्यक्तीने गजब दाव…
त्यामुळे नागरिकांनी खाजगी रुग्णालयात यापेक्षा अधिक किंमत देऊन लसीकरण करू नये. कारण केंद्राने खासगी रुग्णालयांमध्ये या लसींची कमाल किंमत निश्चित केली आहे. याच बरोबर लसीकरण करण्यासाठी पूर्व नोंद गरजेची नाही.आजपासून या टप्प्यात दररोज 50 लाख लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
सावधान: जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…
कोरोनाच्या काळामध्ये अनेक गैरप्रकार घडले आहेत, त्यामुळे कोरोना लसीकरणाचे योग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र योग्य आहे की अयोग्य कसे पहाल. verify.cowin.gov.in या लिंकवर क्लिक करा. यात तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल. मोबाईलमधील कॅमेऱ्याच्या मदतीने लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करा. लसीकरणाच्या सुविधा इत्यादी सर्व गोष्टी दिसू शकतील.
हेही वाचा :
“या” बँकेची भन्नाट मुदत ठेव योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल उत्तम परतावा…