Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता ‘आनंदाच्या शिधा’सोबत मिळणार साडी; ‘या’ कागदपत्रांची आहे आवश्यकता
Good news for ration card holders! Now you will get sarees with 'Anandache Shidha'; These documents are required
Ration Card | महाराष्ट्र सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक (Ration Card) कुटुंबांना मोफत साडी देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, दरवर्षी चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त लाभार्थी कुटुंबाला एक साडी दिली जाणार आहे.
कसा मिळेल लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थी कुटुंबातील सदस्याला त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासह संबंधित रेशन दुकानात जावे लागेल. दुकानदार त्यांचे कागदपत्रे तपासून साडी देईल. या योजनेचा लाभ राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबांना होणार आहे. या योजनेसाठी प्रति साडी 355 रुपये खर्च येणार आहे.
वाचा :
‘आनंदाचा शिधा’ वितरणात दिरंगाई
दरम्यान, या योजनेची घोषणा करतानाच ठाकरे गटाने ‘आनंदाचा शिधा‘ वितरणात दिरंगाई आणि घोटाळ्याचा आरोप केला आहे. दिवाळीला सुरुवात झाली तरी अद्यापही काही ठिकाणी सर्वसामान्यांना ‘आनंदाचा शिधा’ मिळालेला नाही. तसेच, मैद्याची अर्धा किलोची पाकिटे प्रत्यक्षात 470-460 ग्रॅम वजनाची आहेत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या आरोपांवर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा :
Web Title: Good news for ration card holders! Now you will get sarees with ‘Anandache Shidha’; These documents are required