ताज्या बातम्या

Ration Card | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! लाखो-करोडो रेशनधारकांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या सविस्तर

Ration Card | सरकारकडून देशातील गरजू गरीब लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना (Yojana) राबवल्या जात आहेत. यासोबतच गरीबांना मोफत किंवा कमी दरात रेशन (Ration Card) देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारचे (Central Government Decision) म्हणणे आहे की, भारतीय अन्न महामंडळ (FCI) गोदामांमध्ये अन्न सुरक्षा, मोफत (Financial) रेशन योजना PMGKAY आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत अन्नाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 44 दशलक्ष टन इतके अन्नधान्य आहे.

वाचा: पंतप्रधान आवास योजनेची नवी यादी जाहीर; त्वरित तपासा तुमचे नाव

किती साठा आहे उपलब्ध?
खरं तर, अन्न मंत्रालयाने सांगितले आहे की, 1 एप्रिल 2023 पर्यंत सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर सुमारे 11.30 दशलक्ष टन गहू आणि 23.6 दशलक्ष टन तांदूळ उपलब्ध होईल. त्याचवेळी, मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) तीन महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याचंकरता 44,762 कोटी रुपये खर्च केले जातील. “राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), इतर योजना आणि PMGKAY च्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी FCI कडे पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे,” असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. या पूलमध्ये सुमारे 23.2 दशलक्ष टन गहू आणि 209 दशलक्ष टन तांदूळ आहे.

वाचा: पेट्रोलचं नो टेन्शन! आता लाँच झाली नवी इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या भन्नाट फीचर्स आणि किंमत

किती करण्यात आला खर्च?
अलीकडेच सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर अशी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. त्याचवेळी, या योजनेच्या शेवटच्या सात टप्प्यांमध्ये, एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत, 3.91 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि 1,121 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो करोडो गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Central government’s big decision! Lakhs and crores of ration holders will get huge benefits, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button