Free LPG Cylinder | दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारचं सामान्यांना मोठं गिफ्ट! १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, तुम्हाला मिळणारं का?
Free LPG Cylinder | केंद्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने देशातील लाखो महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत (PM Ujjvala Yojana) लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलिंडर (Free LPG Cylinder) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशभरातील लाखो कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या महिलांना मिळेल हा लाभ?
या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार आहे ज्यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेतले आहे आणि ज्यांचे आधार कार्ड गॅस कनेक्शनशी लिंक (Adhaar Card Gas Link) आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
किती जणांना मिळणार आहे हा लाभ?
जिल्ह्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत २ लाख १९ हजार ६६७ ग्राहकांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १ लाख ८४ हजार ३९ ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ३९ महिलांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे.
कशी मिळेल ही सुविधा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल. एजन्सीकडे जाऊन आधार कार्ड ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळेल.
वाचा: न्यूझीलंडने फलंदाजीचा घेतला निर्णय! हेन्रीला सँटनर; भारताने केले तीन बदल
काय आहे या योजनेमागील उद्देश?
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेमुळे महिलांना स्वयंपाकाच्या धुरापासून मुक्तता मिळाली आहे आणि त्यांचे आरोग्य सुधारले आहे.
किती मोठा सिलिंडर मिळेल?
या योजनेअंतर्गत १४.२ किलोचा गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने केंद्र सरकारने दिलेली ही भेट महिलांसाठी खूपच महत्त्वाची आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत मिळेल.
हेही वाचा:
• ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर भिडले गगनाला! जाणून घ्या काय आहे 1 ग्रॅम सोन्याचा दर