सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे बळीराजा हताश झाला असताना त्याची फसवणूक होण्याच्या घटना समोर येत आहे. कृषी केंद्राकडूनच (agriculture center) शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
- “या” फळाची बाजारात दमदार एंट्री; खरेदीसाठी ग्राहकांची होतेय प्रचंड गर्दी, पहा या फळाचे काय आहेत दर..
कृषी केंद्रावरून (agriculture center) देण्यात येत असलेल्या खतांमध्ये मोठ्याप्रमाणावर भेसळ आणि गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे. प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील एका कृषी केंद्रावर हा प्रकार घडला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्राच्या संशयास्पद कारभाराविरोधात तक्रार नोंदवली होती.
तपासणी सुरू लवकरच कारवाई होणार –
शेतकऱ्यांना (farmers) देण्यात येणाऱ्या खतांच्या पिशव्या कमी वजनाच्या असतात. तसेच या खतांमध्ये भेसळ झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी याआधी केलेला आहे. खतांमध्ये भेसळ करण्यासाठी माती आणि चुन्याचा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना (farmers) खत खरेदीनंतर कच्ची बिलं दिली जातात. त्यामुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा संशय स्पष्ट केला आहे.
वाचा –
तसेच कृषी केंद्रावरील (agriculture center) खताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कृषी केंद्रावरील (agriculture center) खतांचे काही नमुने घेत ते तपासणीसाठी अमरावती येथे प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होईल याकडे सर्वांच्या लक्ष वेधले आहे.
हे ही वाचा –