ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून फसवणूक; “ही” धक्कादायक बातमी आली समोर..

शेतकऱ्यांच्या (Farmers) गेल्या वर्षी राज्यात सर्व ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात तुफान अतिवृष्टी झाल्याने पिकांसह जमिनी पुराने खरडून वाहून गेल्या होत्या. या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी जाऊन पाहणी केली होती. मात्र अजूनही लोकांना मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना (Farmers) आशेवर ठेवून त्यांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया…

वाचा –

ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने चांदवड तालुक्यात पूर्व आणि दक्षिण भागात असंख्य शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी पुराने खरडून वाहून गेल्या होत्या. या नुकसानग्रस्त जमिनींची सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी केली होती. नुकसानीची तीव्रता मोठी असल्याने सरकारने सर्व बाधितांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण याप्रमाणे कोणतेही कामे झाली नाहीत असे आरोप आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची प्रक्रिया समोर आली आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वर्ष झाले तरी मदत मिळाली नाही –

वर्षभरात सरकारने कुठलाही शासन निर्णय (Ruling) काढला नाही. त्यामुळे कुणालाच मदत मिळाली नाही. शासनाने आदेश दिले नाही म्हणून कृषी आणि महसूल विभागाने (Department of Agriculture and Revenue) याची आकडेवारी गोळा करण्याची तसदी घेतली नाही. मात्र आता वर्ष झाले तरी मदत का नाही, म्हणून लोकांकडून मीडियाकडे विचारणा होऊ लागली. असंख्य लोकांच्या जमिनी पाण्याने वाहून गेल्या होत्या. याची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.

वाचा –

या ठिकाणातील शेतकरी मदतीपासून वंचित –

महाविकास आघाडीने दोन वर्षांत राज्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन जमीन खरडून गेली तेथे कोणत्याही विभागाला मदत दिली नाही. ही माहिती समोर आलेली आहे. फक्त घोषणा करून वेळ मारून नेली. कोल्हापूर, कोकण, रत्नागिरी किंवा मराठवाडा असे सर्व ठिकाणचे शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button